भाजपमध्ये शेवटची मेगाभरती, दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची शक्यता

भाजपने (BJP) शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण ताकद लावण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीतील (NCP) असंतुष्ट नेत्यांना गळाला लावणे भाजपने अद्यापही थांबवलेलं नाही.

भाजपमध्ये शेवटची मेगाभरती, दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections Announced) तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. मात्र, भाजपने (BJP) शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण ताकद लावण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीतील (NCP) असंतुष्ट नेत्यांना गळाला लावणे भाजपने अद्यापही थांबवलेलं नाही.

उद्या (22 सप्टेंबर) भाजपची शेवटची मेगा भरती आहे (BJP Last Mega Bharti). या भरतीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेते भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. शेवटच्या मेगाभरतीतूनही भाजप पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या विचारात आहे. या भरतीत काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचा एक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी भाजपच्या 3 मेगाभरती पार पडल्या आहेत. उद्याच्या भरतीत भाजपचं कमळ हाती घेणाऱ्यांमध्ये 3 आमदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी गृहराज्यमंत्री आणि अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे (Siddhram Mhetre), पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke), माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde), मुंबई काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh join BJP) आणि अहमदनगरच्या राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड (Manjusha Gund) या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

कृपाशंकर सिंग यांचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी काहीच दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला. कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला. कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.

संबंधित बातम्या :

भाजपची बुधवारी दिवसभर मेगाभरती, दिग्गज नेते काँग्रेस, राष्ट्रवादी सोडणार

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती, भाजपमध्ये मेगाभरती नाही : मुख्यमंत्री

भाजपची मेगाभरती, ‘हे’ दिग्गज पक्षप्रवेश करणार?

Published On - 9:46 pm, Sat, 21 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI