नाथाभाऊंच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान, तिकडे चांगलं काम करावं : चंद्रकांत पाटील

नाथाभाऊंच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान आहे," असे प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Chandrakant Patil Comment On eknath khadse Resign)

नाथाभाऊंच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान, तिकडे चांगलं काम करावं : चंद्रकांत पाटील
| Updated on: Oct 21, 2020 | 3:39 PM

मुंबई : “नाथाभाऊ किती रागवले तरी ते हे पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी पक्षात राहून नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा होती. नाथाभाऊंच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान आहे,” असे प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर दिली. (Chandrakant Patil Comment On eknath khadse Resign)

“काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे पोहोचला. ते कितीही रागवले तरी हे पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी पक्षात राहावं नेतृत्व करावं असं आमची इच्छा होती. पण कोणती गोष्ट ठरलेली असते ती टाळू शकत नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“नाथाभाऊंनी तिकडे जाऊन चांगलं काम करावं. त्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांनी राजीनामा का दिला, हे त्यांनाच विचारावं लागेल,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“मी त्यांना वारंवार सांगत होतो. एकत्र बसू त्यावर पडदा पाडू. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, पण याबाबत काही झालं नाही. माझा आणि त्यांचा चांगल्या प्रकारे संवाद असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करत होतो. एकत्र बसू अस वारंवार म्हणत होतो. चर्चा होऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न करत होतो. काही प्रयत्न असतात ते अपयशी होतात,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“तुटपर्यंत ताणलं की नाही यावर माझं वेगळं मत असू शकत. आपण नेहमीच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा सर्वांनी संवाद साधला. कारण आमच्यात पक्षश्रेष्ठींनी संवाद साधला की सगळ्यांनी संवाद साधणे गरजेचे नसते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.  (Chandrakant Patil Comment On eknath khadse Resign)

संबंधित बातम्या : 

…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे