महाआघाडीची कोथरुडसाठी ऑफर, चंद्रकांत पाटील प्रविण तरडेंच्या भेटीला

| Updated on: Oct 02, 2019 | 11:11 PM

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरोधात (Chandrakant Patil Vs Pravin Tarade) निवडणूक लढवण्यासाठी (Maharashtra Assembly Election) महाआघाडीकडून आणि इतर काही पक्षांनी विचारणा केली आहे.

महाआघाडीची कोथरुडसाठी ऑफर, चंद्रकांत पाटील प्रविण तरडेंच्या भेटीला
Follow us on

पुणे: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरोधात (Chandrakant Patil Vs Pravin Tarade) निवडणूक लढवण्यासाठी (Maharashtra Assembly Election) महाआघाडीकडून आणि इतर काही पक्षांनी विचारणा केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी स्वतः प्रविण तरडेंच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन आज त्यांची भेट (Chandrakant Patil meet Pravin Tarade) घेतली. तरडे यांनी आपण चंद्रकांत पाटलांच्या विरोधात लढण्याच्या सर्व ऑफरला नकार दिल्याचंही सांगितलं आहे.

प्रविण तरडेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं, “मला महाआघाडी आणि इतर पक्षांकडून चंद्रकांत पाटलांविरोधात लढण्याच्या ऑफर आल्या आहेत. मात्र, मी त्या सर्वांना नकार दिला आहे. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचा (RSS/आरएसएस) कार्यकर्ता (Pravin Tarade RSS Worker) आहे. त्यामुळे मी चंद्रकांत पाटलांविरोधात कसा उभा राहिल.”

प्रविण तरडेंनी चंद्रकांत पाटलांविरोधात उभं न राहण्याचं स्पष्ट केल्यामुळे आता तरडेंच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, तरिही पक्षांतर्गत नाराजी किती शांत झाली आहे हा प्रश्न कायम आहे.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचा बंड शमला

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Kothrud) यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर सुरुवातीला बंड करणाऱ्या मेधा कुलकर्णींनी (Medha Kulkarni) देखील आता माघार घेतली आहे. त्यांनी स्वतः चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात उपस्थित राहून चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला. माझी पक्षावर निष्ठा आहे. मला खंजीर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत त्या भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या.

लोकांमधून निवडून न आल्याची बोच

महसुल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही विधानसभा महत्त्वाची आहे. चंद्रकांत पाटील एकदाही लोकांमधून निवडून आलेले नाही. या टीकेने मागील बराच काळ चंद्रकांत पाटलांना त्रास दिला आहे. स्वतः शरद पवारांनी त्यांना अनेकदा हा टोमणा मारला आहे. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये भाजपचा जम बसवणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी सुरक्षित जागा म्हणून कोल्हापूरमधील मतदारसंघाची निवड न करता पुण्यातील कोथरुड मतदारसंघाची निवड केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

ब्राम्हण महासंघाचं आव्हान कायम

दरम्यान, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही. भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही, तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.