AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, नवी समीकरणं काय? मनसेच्या एकमेव आमदाराची लॉटरी लागणार?

राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करतानाच भाजपतर्फे मनसेशी जवळीक साधली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी खेळी असू शकते, असे म्हटले जात आहे.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, नवी समीकरणं काय? मनसेच्या एकमेव आमदाराची लॉटरी लागणार?
माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीची इतरांना मळमळ का? विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसही बसरसलेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 15, 2022 | 1:01 PM
Share

मुंबईः उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला भगदाड पाडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. यातच आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपक्षे आहे. भाजपशी सलगी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता भाजपदेखील सावधगिरीने पावलं टाकत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबईत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.

मनसेला मंत्रिपद?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनेसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना भेटणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र ही भेट काही दिवसांपासून लांबणीवर पडली होती. आज शुक्रवारी अखेर फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, हे अद्याप समोर आलेलं नाही. मंत्रिपदाविषयी आमदार राजू पाटील यांनी काल प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणत्याही अपेक्षेने भाजपाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र सभागृहात संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करू, असे ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

एकनाथ शिंदेगट आणि भाजप या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या . राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र यापुढेही काहीतरी राजकीय हेतू असल्याचाही संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय.

मनसेशी जवळीक वाढतेय?

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजप आणि मनसेची जवळीक वारंवार पहायला मिळत आहे. त्यानंतर राज्यात गेल्या महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार समाधानकारक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कुठे तरी भाजपच्या या सर्व खेळींना मनसेचा पाठींबा असल्याचं दिसून येतंय. राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करतानाच भाजपतर्फे मनसेशी जवळीक साधली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी खेळी असू शकते, असे म्हटले जात आहे.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती