राष्ट्रीय मुद्दयावर बोलतोय, देशात कलम 370 लागू होणार नाही म्हणजे नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Nov 18, 2020 | 5:51 PM

जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या गुपकर अलायन्सच्या मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

राष्ट्रीय मुद्दयावर बोलतोय, देशात कलम 370 लागू होणार नाही म्हणजे नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या गुपकर अलायन्सच्या मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. देश तोडण्याची भाषा करणाऱ्या गुपकर अलायन्सचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल करतानाच मी राष्ट्रीय मुद्द्यावर बोलतोय. आता काहीही झालं तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. (bjp leader devendra fadnavis slams congress over gupkar alliance)

मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. राष्ट्रीय मुद्द्यावर बोलण्यासाठी मी आज इथे आलो आहे. देशात 70 वर्षांच्या संघर्षानंतर 370 कलम रद्द करण्यात आलं आहे. आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीही पूर्वपदावर आली आहे. जम्मू-काश्मीरला भारताचा कायदा लागू झाल्याने तिथे कुणीही गुंतवणूक करू शकतो आणि जमिनीही खरेदी करू शकणार आहे. असं असताना काही विरोधी शक्तींचा मात्र काही तरी वेगळाच डाव सुरू आहे. तिथे विरोधकांची गुपकर अलायन्स नावाने आघाडी तयार झाली आहे. या आघाडीत काँग्रेसही सहभागी आहे. या आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी चीनच्या मध्यस्थीने काश्मीरप्रश्न सोडवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काँग्रेसला या गुपकर अलायन्सचा अजेंडा मान्य आहे का? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असं आव्हान फडणवीस यांनी दिले.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि या अलायन्सच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या सुद्धा काश्मीरचा झेंडा बहाल केला नाही तर भारताचा राष्ट्रीय ध्वज काश्मिरात फडकवू देणार नसल्याची भाषा करत आहेत. तरीही काँग्रेस या विघटनवादी शक्तींसोबत जात आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसला रोज प्रश्न विचारून उघडं पाडण्याचं काम करू, असा इशारा देतानाच आता काहीही झालं तरी पुन्हा 370 कलम लागू होणारच नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू : देवेंद्र फडणवीस

भाजप इलेक्शन मोडवर,अमित शाहांचे मिशन बंगाल तर जे.पी.नड्डांची भारत प्रवास यात्रा

बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

(bjp leader devendra fadnavis slams congress over gupkar alliance)