…म्हणून मोदींवर टीका करणारं ‘ते’ ट्विट डिलीट केलं : एकनाथ खडसे

| Updated on: Oct 21, 2020 | 3:03 PM

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं ट्विट भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट करून पुन्हा डिलिट केलं होतं. त्यावर खुद्द खडसे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विट डिलिट करण्यामागचं नेमकं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

...म्हणून मोदींवर टीका करणारं ते ट्विट डिलीट केलं : एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं ट्विट भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट करून पुन्हा डिलिट केलं होतं. त्यावर खुद्द खडसे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विट डिलिट करण्यामागचं नेमकं कारणही त्यांनी सांगितलं आहे. (bjp leader eknath khadse clarify on his tweets)

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेचं ट्विट डिलिट केल्याची माहिती दिली. माझ्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड दोघा-तिघांकडे आहे. त्यामुळे कुणी तरी चुकून ते रिट्विट केलं. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी हे ट्विट डिलिट केलं, असं खडसे म्हणाले.

मी लाचार नाही

यावेळी खडसे यांनी मी लाचार नाही. कुणाचेही पाय चाटणारा नाही, असा घणाघात केला. माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार येणार नाही. मी एकटाच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा माझ्या एकट्याचाच निर्णय आहे, असंही ते म्हणाले.

ट्विट डिलिट केलं आणि….

नाथाभाऊंनी सकाळी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट केल्याचं मला समजलं. त्यानंतर मी नाथाभाऊंना फोन केला. माझ्या फोननंतर त्यांनी ते ट्विट डिलिटही केलं. त्यामुळे ते पक्षात थांबतील, पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाहीत, असं मला वाटलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला. त्याला नाईलाज आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

काय होतं ट्विट

आजच्या भाषणात पंतप्रधान काही तरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही, असे ट्विट करत मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं. (bjp leader eknath khadse clarify on his tweets)

संबंधित बातम्या:

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं, खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची तोफ’ धडाडली

Eknath Khadse | रक्षा खडसेंचा निर्णय काय? एकनाथ खडसे म्हणाले….

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

(bjp leader eknath khadse clarify on his tweets)