सामान्यांची एकच, मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का?, किरीट सोमय्यांचा सवाल

| Updated on: Jun 22, 2020 | 7:23 PM

"आरोग्यमंत्री राजेश टोपे याचे उत्तर देणार का..?" असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला (Kirit Somaiya Criticizes Dhananjay Munde) आहे.

सामान्यांची एकच, मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का?, किरीट सोमय्यांचा सवाल
Follow us on

रायगड : “राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा कोरोना टेस्ट केली. मग सर्वसामान्यांची एकदाच टेस्ट का करण्यात येते, हा दुजाभाव का?” असा प्रश्न माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. (Kirit Somaiya Criticizes Dhananjay Munde Corona testing)

“धनंजय मुंडे यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. सामान्यांची मात्र एकदा टेस्ट करण्यात येते, हा दुजाभाव का? कमीत कमी चाचण्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र धनजंय मुडे हे एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या लक्षणं न आढळल्याने त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आली,” असेही किरीट सोमय्या म्हणाले.

“आरोग्यमंत्री राजेश टोपे याचे उत्तर देणार का..?” असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता आरोग्यमंत्री याचे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात

दरम्यान आज (22 जून) धनंजय मुंडे यांना  ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.

धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघेच जण  रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. (Kirit Somaiya Criticizes Dhananjay Munde Corona testing)

संबंधित बातम्या : 

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन