AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री अज्ञानी, सरकार पुढे जात नाही याला उद्धव ठाकरे जबाबदार : नारायण राणे

पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे," असेही राणे म्हणाले. (Narayan Rane Criticism Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री अज्ञानी, सरकार पुढे जात नाही याला उद्धव ठाकरे जबाबदार : नारायण राणे
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 20, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. त्यांना ना खड्डे माहिती आहे, ना राज्याची तिजोरी माहिती आहे,” अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. “गाडी कशी चालवायची हे माहिती असेल, पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. अज्ञान आहे. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. पगार होत नाही, याला कारण उद्धव ठाकरे आहे,” असेही राणे म्हणाले.  (Narayan Rane Criticism On CM Uddhav Thackeray)

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला हवं, असे सांगितलं होते. पण साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं. उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवलं. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव करा, अशी हूल देत आहे. पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहे. कलेक्शन हे एककलमी कार्यक्रम आहे. हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही. मी सांगितलं तर सर्व फेल जातं. म्हणून मी काही सांगणार नाही,” असे राणेंनी सांगितले.

“…तर परिणाम गंभीर होतील”

“भाजपच्या कोणत्याही सदस्यांना फिरवायची ताकद महाविकासआघाडीत  नाही. जर तसं झालं तर त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा इशारा नारायण राणेंनी दिला.

“वाढीव वीजबिल माफ करु असे बोलले होते. मात्र आता काहीही करत नाही. याबाबत लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. रस्त्यावर उतरुन काय होणार आहे?” असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला.

“शरद पवार सोडून बाकी सर्व नौटंकी” 

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सरकारमध्ये आहेत. म्हणून मी शब्द वापरत नाही. पण शरद पवार सोडून बाकी नौटंकी आहे,” अशी खोचक टीकाही राणेंनी केली.

“मराठा आरक्षणाबद्दल तारीख पे तारीख दिली जात आहे. त्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. राज्यातील खड्डे बुजवत नाही. त्याला शिवसेना जबाबदार आहे. कोकणात काहीही केलं नाही,” असेही ते म्हणाले. (Narayan Rane Criticism On CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

“उद्धवजी फार चांगली कार चालवतात, पण…” देवेंद्र फडणवीसांचा टोला

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...