Nilesh Rane | त्यांना लॉलीपॉप चिन्ह देऊन टाका, निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका, Video पहाच!

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली. यात त्यांनी पक्षचिन्हावर जो दावा केला जातोय, त्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ' शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Nilesh Rane | त्यांना लॉलीपॉप चिन्ह देऊन टाका, निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका, Video पहाच!
निलेश राणे, भाजप नेते
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 4:06 PM

मुंबईः शिवसेनेचं पक्षचिन्ह कुणाकडे जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आपल्याला मिळावं, यासाठी कायदेशीर हालचाली सुरु केल्या आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जहरी टीका केली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शोभणारं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व मवाळ आहे. या चिन्हासाठी एखादं रफ अँड टफ माणूस पाहिजे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही, मात्र त्यांना असं काही तरी लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. आयोगाने दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत यासंबंधीचे पुरावे देण्यास सांगितले आहे. तत्पुर्वी 1 ऑगस्ट रोजी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. ते म्हणाले, ‘ कोर्टात हा वाद सुरु आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे चिन्ह आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते मवाळ आहेत. बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, ते दिलं पाहिजे. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. ते फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. धनुष्यबाण चिन्हासाठी असा कुणीतरी रफटफ पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांच्यावर शोभायचं ते चिन्हं. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल. धनुष्यबाण शोभणारं नाही….

‘आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही’

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली. यात त्यांनी पक्षचिन्हावर जो दावा केला जातोय, त्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. पण पक्षाच्या नावावर जे काही सुरु आहे, ते दुर्दैवी आहे…