‘सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच’, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान

| Updated on: Sep 20, 2020 | 9:03 PM

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलंय (BJP challenge Shivsena over Nanar project).

सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान
Follow us on

रत्नागिरी : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलंय (BJP challenge Shivsena over Nanar project). भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडेल, पण रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प होणारच असं खुलं आव्हान दिलं. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल, असाही दावा जठार यांनी केला.

रत्नागिरी रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पेटल्याने कोकणातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे. नाणार समर्थकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प होणारच नाही अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी घेतली होती. त्यानंतर याला आता भाजपने त्याला उत्तर दिलंय.

नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही म्हणणाऱ्या शिवसेनेला भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत प्रत्युत्तर दिलंय. सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच असं थेट आव्हान जठार यांनी शिवसेनेला दिलंय. महाविकास आघा़डी सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प नाणारमधून जाणार नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर नाणारची पुन्हा अधिसूचना निघेल, असा दावा प्रमोद जठार यांनी केलाय.

प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी समर्थकांना हा प्रकल्प होणारच असा विश्वास दिला आहे. ते म्हणाले, “ज्या दिवशी भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल.” रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने समर्थन वाढतंय हे सांगण्यासाठी ज्या वकिलांचं शिष्टमंडळ गृहनिर्माण मंत्र्यांना जावून भेटलं त्यांचं प्रमोद जठार यांनी जाहिर अभिनंदन केलं. शिवसेनेने दीड लाख लोकांचे रोजगार हिरावून घेवू नये, असंही मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

‘नाणार’बाबत दोन महिन्यांचा अल्टिमेटम, फेरविचार करा, मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती : प्रमोद जठार

Uday Samant | नाणारमध्ये रिफायनरी होऊ देणार नाही : उदय सामंत

‘नाणार’वरुन राजन साळवी चक्रव्यूहात, विलास चाळके-राजन साळवी वाद चव्हाट्यावर

संबंधित व्हिडीओ :

BJP Shivsena over Nanar project