AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांना बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत प्रवेश, प्रवीण दरेकरांचा आरोप

खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत घेतलं, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी खडसेंवर केला.  (Pravin Darekar On Eknath Khadse BJP Resign) 

फडणवीसांना बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत प्रवेश, प्रवीण दरेकरांचा आरोप
| Updated on: Oct 22, 2020 | 11:29 AM
Share

सातारा : “चांगला कारभार करा, नांदा सौख्य भरे,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दिली. तब्बल चार दशकांपासून भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. यावरुन भाजपमधून त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात येत आहे. (Pravin Darekar On Eknath Khadse BJP Resign)

प्रवीण दरेकर हे आज सातारा दौऱ्यावर आहे. दरेकर यांना एकनाथ खडसेंच्या राजीनामा आणि राष्ट्रवादी प्रवेशावर विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काहींना आकस आणि पोटशूळ आहे. ज्यांनी या राज्याचे 5 वर्ष सक्षमपणे नेतृत्व केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता येत नाहीत यासाठी त्यांची छबी बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत घेतलं,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी खडसेंवर केला.

“केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना तपासासाठी आता यापुढे राज्य सरकारची परवानगीबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले,  राज्य सरकार आणि केंद्र सरकार संघर्ष उभा करणे, हे या लोकशाहीमध्ये योग्य नाही. हा निर्णय योग्य पद्धतीचा नाही.”

“शेतकऱ्यांसाठी काहीतरी घोषणा करा” 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर आणि उस्मानाबादला आल्यावर त्यावेळेस काहीतरी घोषणा करतील असे वाटले होते. अजून दोन दिवसांत त्यांनी काहीतरी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. हा विषय आम्ही राजकीय दृष्टीतून पाहत नाही अशा वेळेत शेतकऱ्यांना एका बाजूला दीर्घकाळ उपाययोजना तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. फडणवीस सरकारच्या काळात ओला दुष्काळाच्या काळात स्वतंत्र GR काढला, असेही मत प्रवीण दरेकरांनी यावेळी व्यक्त केले. (Pravin Darekar On Eknath Khadse BJP Resign)

संबंधित बातम्या : 

यंदाचा सावरगाव दसरा मेळावा ऑनलाईन, भगवान भक्तीगडावर येऊ नका,पंकजा मुंडेंचे आवाहन

‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा

Follow Us
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ