‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे.

'खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है'; मुश्रीफ यांचा सूचक इशारा
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 10:31 AM

कोल्हापूर: भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधील आणखी काही नाराज नेते लवकरच राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (hasan mushrif on eknath khadse resign)

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असं सांगतानाच आगामी काळात भाजपमध्ये गेलेले काठावरचे अनेक नेते राष्ट्रवादीत येतील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यात मदतच होणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मुश्रीफ यांनी भाजपमधील अनेकजण राष्ट्रवादीत येणार असल्याचं सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, काल काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही ट्विट करून ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’, असं सांगून खळबळ उडवून दिली होती. . एकनाथ खडसे यांचा भाजपचा राजीनाम्यातून भाजपची कार्यशैली उघड झाली आहे. अभी तो ये शुरूवात है. ट्रेलर शुरू हुआ है, पिक्चर तो अभी बाकी है, असं सातव म्हणाले होते. दरम्यान, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली होती. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले होते. (hasan mushrif on eknath khadse resign)

संबंधित बातम्या:

नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या जाण्यानं पक्ष थांबत नाही

सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय कलगीतुरा बंद करा, आधी शेतकऱ्याला मदत करा, संभाजीराजेंचा सल्ला

…तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे घोटाळे बाहेर निघतील

(hasan mushrif minister on eknath khadse resign)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.