खडसेंचा राजीनामा; ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है; सातव यांचे सूचक संकेत

एकनाथ खडसे यांचा भाजपचा राजीनाम्यातून भाजपची कार्यशैली उघड झाली आहे. अभी तो ये शुरूवात है. ट्रेलर शुरू हुआ है, पिक्चर तो अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे.

खडसेंचा राजीनामा; ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है; सातव यांचे सूचक संकेत
राजीव सातव, काँग्रेस

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसनेीह त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला आणखी भूकंपाची धक्के बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (congress leader rajiv satav on eknath khadse resign)

राजीव सातव यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा राजीनाम्यातून भाजपची कार्यशैली उघड झाली आहे. अभी तो ये शुरूवात है. ट्रेलर शुरू हुआ है, पिक्चर तो अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे.

पूरग्रस्तांना तातडीने मदत करा

राज्यात पूरस्थिती फार बिकट आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही सातव यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, अशी आमची आग्रही मागणी आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारकडे जीएसटीचे पैसे थकलेले आहेत. हे राज्याच्या हक्काचे पैसे होते. त्यामुळे केंद्राने राज्याचे हे पैसे लवकरात लवकर द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला जास्तीत जास्त मिळवून द्यावी. त्यांनी बिहारमध्ये प्रचार जरुर करावा. पण महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केलीय. केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केलं आहे. पंजाबप्रमाणेच आमचाही या विधेयकाला विरोध असून हे विधेयक राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले. (congress leader rajiv satav on eknath khadse resign)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

(congress leader rajiv satav on eknath khadse resign)

Published On - 1:35 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI