पृथ्वीबाबांनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये, मोदींच्या नेतृत्वात सुवर्णयुग नक्कीच येणार : विखे पाटील

| Updated on: May 15, 2020 | 6:55 PM

"पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मंदिराच्या सोन्याची काळजी करु नका", असा सल्ला भाजप आमदार राधाकष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil on Prithviraj Chavan) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.

पृथ्वीबाबांनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये, मोदींच्या नेतृत्वात सुवर्णयुग नक्कीच येणार : विखे पाटील
Follow us on

शिर्डी : “पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मंदिराच्या सोन्याची काळजी करु नका”, असा सल्ला भाजप आमदार राधाकष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil on Prithviraj Chavan) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करत, “सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे”, असं सांगितले होते. चव्हाणांच्या या ट्वीटवर आज (15 मे) विखे पाटील यांनी सल्ला (Radhakrishna Vikhe Patil on Prithviraj Chavan) दिला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मंदिराच्या सोन्याची काळजी करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नक्कीच सुवर्णयुग येणार आहे. बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये.”

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती.

“पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली आहे की, देशातील सोनं सरकारने ताब्यात घ्यावे. मला त्यांना एक विचारायचे आहे की, त्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी ही मागणी करण्यास सांगितले आहे का? हे काँग्रेसचे मत आहे का? ही मागणी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची आहे का?”, असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे जवळपास 76 लाख कोटी रुपयांचं सोनं आहे. हे सोनं केंद्र सरकारने 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं”, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारला अधिकच्या नोटा छापाव्या लागतील, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनादेखील याबाबत सूचना केली होती. मिळेल तेवढं कर्ज काढा, तसंच केंद्राकडून मदत मिळवा, अशी सूचना त्यांनी अजित पवारांना केली होती.

“अर्थमंत्र्यांना सल्ला आहे की, या अडचणीच्या प्रसंगी केंद्र सरकारकडून मिळेल, तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील. या परिस्थितीत मला अजून यावाचून दुसरा काहीही पर्याय दिसत नाही”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांना दिला होता.

संबंधित बातम्या :

आधी नोटा छापण्याचा, आता देवस्थानातील सोने ताब्यात घेण्याचा सल्ला, पृथ्वीराज चव्हाणांच्या केंद्राला सूचना