आधी नोटा छापण्याचा, आता देवस्थानातील सोने ताब्यात घेण्याचा सल्ला, पृथ्वीराज चव्हाणांच्या केंद्राला सूचना

केंद्र सरकारने सर्व देवस्थान ट्रस्टकडून सोनं ताब्यात घ्यावं, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे (Prithviraj Chavan suggest to Central Government).

आधी नोटा छापण्याचा, आता देवस्थानातील सोने ताब्यात घेण्याचा सल्ला, पृथ्वीराज चव्हाणांच्या केंद्राला सूचना

मुंबई : “देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे जवळपास 76 लाख कोटी रुपयांचं सोनं आहे (Prithviraj Chavan suggest to Central Government). हे सोनं केंद्र सरकारने 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं”, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत ट्विट केलं आहे (Prithviraj Chavan suggest to Central Government). दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला याआधीदेखील अर्थचक्र सुरळीत चालावं यासाठी नोटा छापण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारला अधिकच्या नोटा छापाव्या लागतील, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनादेखील याबाबत सूचना केली होती. मिळेल तेवढं कर्ज काढा, तसंच केंद्राकडून मदत मिळवा, अशी सूचना त्यांनी अजित पवारांना केली होती.

“अर्थमंत्र्यांना सल्ला आहे की, या अडचणीच्या प्रसंगी केंद्र सरकारकडून मिळेल, तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील. या परिस्थितीत मला अजून यावाचून दुसरा काहीही पर्याय दिसत नाही”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांना दिला होता.

‘केंद्राच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचं स्वागत’

“देशावर मोठं संकंट आलं आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज म्हणजे देशाच्या एकूण जीडीपीच्या 10 टक्के इतकी मोठी रक्कम आहे. सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधानांचा या निर्णयाचं स्वागत आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

अर्थचक्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा उपाय, केंद्राला अधिकच्या नोटा छापण्याचा सल्ला

Aatm Nirbhar Bharat : 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार?

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *