भाजपच्या विजयाचा जल्लोष केल्याने कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

| Updated on: May 26, 2019 | 1:04 PM

अमेठी : लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अभूतपूर्व विजयानंतर भाजपसह इतर कार्यकर्त्यांनी गुलाल उडवत सर्वत्र जल्लोष केला. मात्र यामुळे एका कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपच्या विजयाचा जल्लोष केल्याने अमेठीतील भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे […]

भाजपच्या विजयाचा जल्लोष केल्याने कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या
Follow us on

अमेठी : लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अभूतपूर्व विजयानंतर भाजपसह इतर कार्यकर्त्यांनी गुलाल उडवत सर्वत्र जल्लोष केला. मात्र यामुळे एका कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपच्या विजयाचा जल्लोष केल्याने अमेठीतील भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. उत्तरप्रदेशातील गांधी-नेहरु कुटंबाचा पारंपारिक मतदारसंघ अशी ओळख असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विजयाचा जल्लोष केल्यानं एका कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेंद्र हे अमेठीतील बरौलिया गावाचे प्रमुख होते. शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरावर हल्ला केला. यावेळी काही हल्लेखोरांनी सुरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सुरेंद्र यांना उपचारासाठी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेत असताना रसत्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमेठीकडे रवाना झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 6 ते 7 अज्ञात लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीचा 23 मे रोजी निकाल जाहीर झाला. यावेळी सर्वांचे लक्ष उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघाकडे लागलं होतं. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. यंदा अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरुद्ध भाजपमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तिकीट देण्यात आलं होतं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला असला, तरी अमेठी या पारंपारिक मतदारसंघातून काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. राहुल गांधींना अमेठीत केवळ 4 लाख 13 हजार 394 (43.86%) मते मिळाली. यानंतर राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सुरेंद्र सिंह कोण?

सुरेंद्र सिंह हे अमेठीतील बरौलिया गावाचे प्रमुख आहेत. सुरेंद्र यांची ओळख भाजपचे कार्यकर्ते म्हणूनही केली जाते. विशेष म्हणजे भाजप नेत्या भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव होण्यामागे सुरेंद्र सिहं यांचा सहभाग होता.