Jharkhand Exit Polls: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता

| Updated on: Dec 21, 2019 | 8:06 AM

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. झारखंडमध्ये कुणाचं सरकार येणार, मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळणार की अपयश येणार असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत (Jharkhand exit polls).

Jharkhand Exit Polls: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता
Follow us on

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. झारखंडमध्ये कुणाचं सरकार येणार, मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळणार की अपयश येणार असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत (Jharkhand exit polls). त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या जनमत कौल पाहणीत एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. झारखंडमध्ये रघुबर दास यांच्या नेतृत्वातील भाजपला झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच कडवं आव्हान आहे (Jharkhand exit polls).

झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शुक्रवारी (20 डिसेंबर) पूर्ण झालं. यानंतर झालेल्या जनमत कौलात भाजपला धक्का बसत असल्याची दिसत आहे.

आजतक-अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोल:

आजतक-अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोलने भाजपला झारखंड विधानसभेच्या 81 जागांपैकी 22 ते 32 जागा, तर जेएमएमच्या नेतृत्वातील आघाडीला 38 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. AJSU ला 2 ते 5 जागा, JVM ला 2 ते 4 जागा आणि इतरांना 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मतदानाच्या टक्केवारीनुसार भाजपला 34 टक्के, जेएमएमला 37 टक्के, जेव्हीएमला 06 टक्के, AJSU ला 9 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

कशिश न्यूज एग्झिट पोल:

कशिश न्यूजच्या एग्झिट पोलनुसार भाजपला 28, जेएमएम युतीला 40 जागा, AJSU ला 3 जागा, JVM ला 3 जागा आणि इतरांना 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

या एग्झिट पोलनुसार झारखंडमध्ये जेएमएमचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रानंतर आता झारखंड देखील भाजपच्या हातातून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हरियाणामध्ये देखील भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट झाली आहे. मात्र, युतीच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं.