AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : ‘पोलिसांना जमत नसेल, तर एक दिवस हिंदुंच्या हातात द्या, मग बघा…’, नितेश राणे आक्रमक

Nitesh Rane : "मी तुम्हाला आताच सांगतो जर मी इथून गेलो आणि कुणावर केस टाकली तर पुन्हा इथे येऊन तांडव करीन. आमचे रक्त भगवे आहे. यापुढे असे मोर्चे काढणार नाही, मोहल्यामध्ये जाऊन थयथयाट करीन. उनका अली हमारा बजरंग बली" अशी प्रेक्षाभक भाषा नितेश राणे यांनी केली.

Nitesh Rane : 'पोलिसांना जमत नसेल, तर एक दिवस हिंदुंच्या हातात द्या, मग बघा...', नितेश राणे आक्रमक
nitesh rane
| Updated on: Aug 17, 2024 | 1:43 PM
Share

“मी आज एक आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय. आपण काय करतोय, फक्त घोषणा देत बसायचं. जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा कोण आगे बढ बोलत नाही. आम्ही काय करणार नाही, फक्त मोर्चे काढत बसणार. तुमच्या उल्हास नगरमध्ये आज काय चालले आहे, हे काय तुम्हाला माहित नाही” असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. “सलीम अन्सारी, बाबा अन्सारी हा आज जिवंत का आहे?. मी आज त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. आज त्या कुटुंबाची व्यथा मी ऐकली. त्या मुलीच्या कुटुंबाला तिचे वडील भेटायला गेले तर पोलीस सांगतात तुम्हाला भेटता येणार नाही. पोलिसांना मी सांगेन हे सरकार कुणाचे आहेत गृह मंत्री कुणाचे आहेत” असं नितेश राणे म्हणाले.

“पोलिसांना मी सांगेन, तुम्हाला जमत नाही तर एक दिवसाची सुट्टी घ्या आणि हिंदूंच्या हातात द्या. नाही, जर ह्या हिरव्या सापांना मारले तर बघा. त्या मुलीच्या घरी ते हिरवे साप आले आणि त्यांनी तिच्या घरातील मंदिर जाळून टाकले. आज हिंदू म्हणून जागृत राहिला नाही तर तुम्ही पूजा देखील करू शकणार नाही” असं नितेश राणे म्हणाले. “आज हिदू संघटित झाले, त्यामुळे पोलिस फोर्स लावावी लागली. तुम्ही तीन चार तास एकत्र आलात तर या पोलिसांची हवा टाईट झाली” असं नितेश राणे म्हणाले.

‘एका घरात चाळीस चाळीस बांग्लादेशी कसे राहतात?’

“तुमच्या उल्हास नगरमध्ये एकही जिहादी सापडणार नाही. पोलिसांनो तुम्हाला हे बिर्याणी वाले, वाचवायला येणार नाही. तुम्ही बुलडोझर नाही चालवला, तर देवा भाऊचा बुलडोझर चालेल” असं नितेश राणे म्हणाले. “मिरा रोडमध्ये एकदा बुलडोझर चालला, आता ढुंगण पण वर काढत नाही. पोलिसांनो तुम्हाला एक सांगतो हे जिहादी तुमचे कधी होणार नाहीत. आझाद मैदान येथे रझा अकादमी यांनी काय केले ते आठवा. काल नाशिकमध्ये काय झाले. हिरवे वळवळयाला लागले, त्यांना आपल्या हिंदुंनी ताकद दाखवली. दगडफेक त्यांनी केली पण आपल्या लोकांनी जे उत्तर दिले, त्यामुळे आता त्यांना त्यांचा अबू देखील आठवणार नाही. उल्हास नगर मध्ये एका घरात चाळीस चाळीस बांग्लादेशी कसे राहतात?” असा सवाल नितेश राणेंनी केला.

Follow Us
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल.
ठाकरे गटाला मोठा धक्का! चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश
ठाकरे गटाला मोठा धक्का! चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश.
कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका
कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका.
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना..
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना...
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....