महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना झालेला कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय? : नितेश राणे

| Updated on: Feb 22, 2021 | 4:10 PM

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडीतील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय असाच प्रश्न उपस्थित केलाय.

महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना झालेला कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय? : नितेश राणे
उद्धव ठाकरे आणि नितेश राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडीतील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय असाच प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय कोरोना आहे? असा सवाल नितेश राणेंनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावरही सडकून टीका केली (BJP MLA Nitesh Rane suspect corona infection of MVA Government minister).

नितेश राणे म्हणाले, “1 मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या 8 दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय कोरोना आहे? कारण येणाऱ्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे.”

“आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांना कधी आतापर्यंत कोरोना झाला नव्हता. तो बरोबर अधिवेशनाच्या आधी 8 दिवस झाला. छगन भुजबळांनाही नेमका आज सकाळी झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुटुंब संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत झाला नव्हता, तो बरोबर 8 दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,” असंही नितेश राणे यांनी नमूद केलं.

मी WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असंही राणे म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंच्या नवीन सामनामध्ये हिंदूंना विरोध’

आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावरही टीका केली. ते म्हणाले, “आता वेगळ्या प्रकारचा सामना आम्हाला वाचायला मिळतोय. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय. आता हा उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय. इथे हिंदूंना विरोध केला जातो. हिंदूंच्या सणांना विरोध केला जातोय. म्हणून असा सामना वाचायचा आम्ही कधीच सोडून दिलाय. हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे.”

हेही वाचा :

Corona Update | मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, आठ कर्मचाऱ्यांना लागण

धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का?; किरीट सोमय्या यांचा सवाल

व्हिडीओ पाहा :

BJP MLA Nitesh Rane suspect corona infection of MVA Government minister