Corona Update | मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, आठ कर्मचाऱ्यांना लागण

Corona Update | मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, आठ कर्मचाऱ्यांना लागण
मंत्रालय

पुन्हा एकदा मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढू लागली आहे. (Eight Mantralaya Officer Tested Corona Positive) 

Namrata Patil

|

Feb 22, 2021 | 3:58 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. सर्वसामान्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. त्यामुळे  धाकधूक वाढू लागली आहे. (Eight Mantralaya Officer Tested Corona Positive)

मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती क्वारंटाईन झाले आहेत. तसेच महसूल विभागात सॅनिटायझेशनही करण्यात येण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील हे कर्मचारी कोण आहेत, त्यांचा गेल्या दोन दिवसात काही संपर्क आला का? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र मंत्रालयात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने धाकधूक वाढू लागली आहे.

मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या भाऊ-वहिनीला कोरोना

दरम्यान गेल्यावर्षी मार्च महिन्यात  सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या भाऊ आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघांनाही खोकला आणि ताप होता. त्यामुळे ते दोघेही कोरोनाची चाचणी करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले होते. या दोघांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे हे दोघेही काही दिवसांपूर्वी अमेरिकेला जाऊन आले होते.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा भाऊ मंत्रालयात काम करतो. तो आणि त्याचा भाऊ एकाच इमारतीत राहतात. तसेच ते दोघेही सतत एकमेकांना भेटतात. त्यामुळे आता मंत्रालयातील तो कर्मचारी कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी दाखल झाला आहे.

मुंबईची सद्यस्थिती काय? 

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

मुंबईतील कोरोना अपडेट 

24 तासात नवे रूग्ण – 921 24 तासात मृत्यू – 6 एकूण रूग्ण – 3,19,128 एकूण मृत्यू – 11,446 एकूण डीस्चार्ज – 3,00,959 अॅक्टीव्ह रूग्ण – 5859

ठाकरेंच्या अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण

तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सरकारमधील 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.  (Eight Mantralaya Officer Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें