भाजपा आमदार निलंबन प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून निलंबनावर प्रश्नचिन्ह, सुनावणीदरम्यान काय झाले?

भाजपच्या 12 निलंबित (Suspension of 12 BJP MLAs) आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.

भाजपा आमदार निलंबन प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून निलंबनावर प्रश्नचिन्ह, सुनावणीदरम्यान काय झाले?
सुप्रीम कोर्ट

मुंबई :  भाजपच्या 12 निलंबित (Suspension of 12 BJP MLAs) आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे. मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे साठ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 18 जानेवारीला आहे. आठरा जानेवारीला न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले होते. याविरोधात निलंबित आमदारांनी न्यायालयात धाव घेतली.

…हा तर सत्ताधाऱ्यांचा खोडसाळपणा

दरम्यान  याबाबत भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले की, आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मुळात ज्या पद्धतीने भाजपाच्या आमदारांचे निलंबन झाले, तो प्रकारच चुकीला होता. ते विधानभवनाच्या प्रथा परपंरांना धरून नव्हते, आमच्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आली. भाजपाच्या आमदारांना विधानसभेबाहेर ठेवण्याचा हा खोडसाळ डाव होता, आम्ही नियमाला धरून विधिमंडळाकडे गेलो होतो, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही याविरोधात न्यायालयाकडे दाद मागितली. विधिमंडळात नाही मिळाला तर सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा असेल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

काय म्हणाले अशिष शेलार?

दरम्यान सुप्रीम कोर्टात आज नेमके काय झाले?  याबाबत भाजपा नेते अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बारा आमदार निलंबन प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय नक्कीच मिळेल असे अशिष शेलार यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपला अजून मोठे धक्के बसणार? शरद पवारांचा मोठा दावा

Goa Election 2022: गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार का? पवार म्हणाले, तर आम्हाला समाधान !

शरद पवारांनी कोणत्या अधिकारात एसटीबाबत बैठक घेतली? भाजपच्या प्रश्नाला आता पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI