पडळकर आमदार होईपर्यंत चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांदीच्या वहाणा आणि पॅशन बाईक

| Updated on: Feb 20, 2021 | 9:44 AM

जयकुमार गोरे यांचे भाषण सुरु असताना पडळकर भावनिक झाल्याने गोपीचंद पडळकर यांना अश्रू अनावर झाले. (Gopichand Padalkar Silver Chappal Passion bike)

पडळकर आमदार होईपर्यंत चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांदीच्या वहाणा आणि पॅशन बाईक
गोपीचंद पडळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांचा सन्मान
Follow us on

सांगली : गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. दोघांना चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करण्यात आली, तर एका कार्यकर्त्या वारसालाही गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. (BJP MLC Gopichand Padalkar gifts Silver Chappal and Passion bike to volunteers who walked barefoot)

गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी 2006 पासून पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी 2009 पासून चपला घातल्या नव्हत्या. या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करत सन्मान करण्यात आला.

दुसरीकडे, गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत, तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, असं 2009 मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना पॅशन गाडी प्रदान करुन सन्मान करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पडळकरांना स्टेजवर अश्रू अनावर

दरम्यान, कार्यक्रमा दरम्यान स्टेजवर बसलेल्या गोपीचंद पडळकर यांना रडू कोसळले. जयकुमार गोरे यांचे भाषण सुरु असताना पडळकर भावनिक झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. काही गोष्टींवरुन बिनसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला.

गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना  विधानपरिषदेला संधी दिली.

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जेसीबीतून 100 पोती फुलांचा वर्षाव

(BJP MLC Gopichand Padalkar gifts Silver Chappal and Passion bike to volunteers who walked barefoot)