AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज ठाकरेंचा बापही अयोध्येला येऊ शकणार नाही”, बृजभूषण सिंह यांनी पुन्हा मनसेला ललकारलं…

टीव्ही 9 सोबत बातचित करताना त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, "राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही."

राज ठाकरेंचा बापही अयोध्येला येऊ शकणार नाही, बृजभूषण सिंह यांनी पुन्हा मनसेला ललकारलं...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार बृजभूषण सिंहImage Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 26, 2022 | 5:45 PM
Share

मुंबई : बृजभूषण सिंह… उत्तर प्रदेशचे खासदार. पण त्यांची चर्चा होते महाराष्ट्राच्या राजकारणात… कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर ते विधान करतात. त्यानंतर बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) या नावची चर्चा राज्याच्या राजकारणात होत राहते. आताही त्यांनी टीव्ही 9 सोबत बातचित करताना राज ठाकरेंना एका वाक्यात आव्हान दिलं आहे. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”

बृजभूषण सिंह काय म्हणाले?

टीव्ही 9 सोबत बातचित करताना त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”

“बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान रामने शिक्षा ग्रहण केली होती. विश्वमित्रने लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलोय”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले.

“माफी मागा मगच अयोध्येत या”

गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांना मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांची प्रतिमा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून लोक राज ठाकरेंविषयी चर्चा करू लागले. अश्यात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक व्यापक करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाचा मुद्दा पोहोचवण्यासाठी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. पण त्याच वेळी उत्तर प्रदेशमधले खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांना आव्हान दिलं. याआधी अनेकदा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात परप्रांतियांच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांना सुनावलं. त्याचाच धागा धरत बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायचं असेल तर उत्तर भारतीयांची माफी मागावी लागेल, अन्यथा अयोध्येत पाय ठेव देणार नाही, असं खुलं आव्हान दिलं. त्यांचं ते आव्हान आधी मनसेला तितकंच गंभीर वाटलं नाही. पण जेव्हा त्याचे पडसाद उमटू लागले तेव्हा मात्र राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. त्यानंतर बृजभूषण सिंह यांनी आज पुन्हा एकदा मनसे आणि राज ठाकरे यांना ललकारलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?