VIDEO | खडसे म्हणाले मोदींची लोकप्रियता घटली, आता सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एका प्रकारे बंगालमध्ये भाजपाचे यशच म्हणावे लागेल" असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं. (Raksha Khadse Eknath Khadse West Bengal )

VIDEO | खडसे म्हणाले मोदींची लोकप्रियता घटली, आता सूनबाई रक्षा खडसे म्हणतात...
Eknath Khadse and Raksha Khadse
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 2:51 PM

जळगाव : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल (West Bengal Election Results 2021) जाहीर होत असून तृणमूल काँग्रेस सहज सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. निकालांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता घटत असल्याचं म्हटलं आहे. तर त्यांच्या सूनबाई असलेल्या भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी भाजपला यश मिळाल्याचं वक्तव्य केलं आहे. (BJP MP Raksha Khadse NCP Leader Eknath Khadse reacts on West Bengal Election Results)

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सारी शक्ती तन-मन-धन जे काही असेल-नसेल त्याचा वापर केला होता, तरी जनतेने नाकारले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता होती, ती आता कुठेतरी घसरल्याची दिसते. महाराष्ट्राचे भाजपचे संकट मोचक या निवडणुकीत अपयशी ठरले” असं एकनाथ खडसे म्हणाले.

रक्षा खडसे काय म्हणाल्या?

“पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या जागा येणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राज्य होते. त्यांना चॅलेंज करुन 100 च्या जवळ आम्हाला जागा मिळवता आल्या. एका प्रकारे बंगालमध्ये भाजपाचे यशच म्हणावे लागेल” असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं.

पश्चिम बंगालची स्थिती काय?

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

“या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात” असे ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी

पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

(Raksha Khadse Eknath Khadse West Bengal )

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.