राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे, असं भाजप नेते निलेश राणे म्हणाले. | Sanjay Rathod resign

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे
निलेश राणे, माजी खासदार

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. (BJP Nilesh Rane On Maharashtra Minister Sanjay Rathod resign)

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे.  राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.

विरोधी पक्षाने एक दबाव निर्माण केला, त्यातून हा राजीनामा दिला गेला आहे. हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलंय. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी, असं निलेश राणे म्हणाले.

भाजपच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणात धमक्या आल्या. परंतु मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्र यांचा बापाचा नाहीय एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रामधून जाणार आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.

संजय राठोड यांनी राजीनामा दिला पण ‘ते’ मूळ प्रकरण काय ?

संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

(BJP Nilesh Rane On Maharashtra Minister Sanjay Rathod resign)

हे ही वाचा :

मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI