मेरा आंगण, मेरा रणांगण, चंद्रकांत पाटलांचा नारा, भाजपचं 22 तारखेला ठाकरे सरकारविरोधात आंदोलन

| Updated on: May 20, 2020 | 2:00 PM

'मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव' अशा प्रकारची भूमिका घेऊन येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टी ठाकरे (BJP Protest Against Mahavikas Aaghadi Government) सरकारविरोधात महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे.

मेरा आंगण, मेरा रणांगण, चंद्रकांत पाटलांचा नारा, भाजपचं 22 तारखेला ठाकरे सरकारविरोधात आंदोलन
Follow us on

मुंबई : ‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टी ठाकरे (BJP Protest Against Mahavikas Aaghadi Government) सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले (BJP Protest Against Mahavikas Aaghadi Government) आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले,  “22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारं प्रतिक म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा.”

“महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार पार झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 70 दिवसाची संख्या ही 40 हजार झाली आहे. केरळमध्ये मृतांची संख्या 12 पार झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 पार होऊन 1400 कडे निघाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उदाहरण आहे”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

“या 70 दिवसात भारतीय जनता पार्टीने आणि सामान्य जनतेने संकट खूप मोठे आहे म्हणून सहकार्य केले पाहिजे अशी भूमिका ठेवली. पण आता लोकं सुद्धा त्यांच्या मनातला राग लपवू शकत नाही आणि विरोधी पक्ष म्हणून भारीतय जनता पार्टी आपली भूमिका बजावत राहील. त्यामुळे काल (19 मे) आम्ही महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या कार्यालयात निवेदन देण्याचे काम आम्ही केले”, असं ही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“महाराष्ट्र सरकराने आतापर्यंत केंद्र काय देते केंद्र काय देत करत करत महाराष्ट्राने स्वत:चे पॅकेज घोषित केले नाही. हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने पॅकेज घोषित केले पाहिजे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. या सर्व गोष्टी घेऊन आपण 22 तारखेला आपल्या घरासमोर उभे राहून निषेध करा”, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या :

तुमचं काम माहीत आहे, बोलत राहिलात तर ट्रेलरही देईन, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये ट्विटर वॉर

मुख्यमंत्री विश्वासात घेतात, पण भाजप नेत्यांना फक्त राज्यपाल दिसतात : बाळासाहेब थोरात

वाद कशाला, मोदींनी आधीच ‘त्या’ स्किमने 20 टन सोनं गोळा केलंय : पृथ्वीराज चव्हाण