मुख्यमंत्री विश्वासात घेतात, पण भाजप नेत्यांना फक्त राज्यपाल दिसतात : बाळासाहेब थोरात

"मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात", अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवर (Balasaheb Thorat Criticism on Bjp Leaders) केली.

मुख्यमंत्री विश्वासात घेतात, पण भाजप नेत्यांना फक्त राज्यपाल दिसतात : बाळासाहेब थोरात

मुंबई : “मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवर (Balasaheb Thorat Criticism on Bjp Leaders) केली. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवेदन देत सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. यावर बाळासाहेब थोरातांनी त्यांना उत्तर (Balasaheb Thorat Criticism on Bjp Leaders) दिले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “भाजप नेते फक्त तक्रारीला राज्यपालांकडे जात आहेत. त्यांना त्याशिवाय काही जमत नाही. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात.”

“भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने सर्व सांगितलं आहे. त्यामुळं सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

“केंद्राचं पॅकेज म्हणजे आधी झाडं लावा मग त्यांना फळं येतील आणि त्यानंतर तुम्ही भूक भागवायची”, अशी टीकाही थोरातांनी केंद्र सरकारवर केली.

“लॉकडाऊनचे आदेश लवकरच निघतील. काय चालू ठेवायचं काय नाही यावर चर्चा सुरु आहे. सध्यातरी आधीचे नियम लागू आहेत”, असं बाळासाहेब थोरात म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणीस?

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बारा बलुतेदारांवरही संकट आलं आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याचं टीकास्त्र फडणवीस यांनी सोडलं.

“सरकारला मदत करण्यास तयार”

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको. आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च माहित नाही, आता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

शाळा उघडल्या नाहीत, तर डिजिटल क्लासरुमचे नियोजन करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *