मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला, महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?

| Updated on: Nov 07, 2019 | 12:41 PM

सत्तास्थापनेसंदर्भात काही घडामोडी घडल्या नाहीत, तर महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जाईल अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला, महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?
Follow us on

मुंबई : भाजप-शिवसेनेतील मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्तास्थापनेसंदर्भात आज काही घडामोडी घडल्या नाहीत, तर महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जाईल (president rule in maharashtra) अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही आणि दुपारपर्यंत शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही, तर महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत भाजपकडे संख्याबळ येत नाही. तोपर्यत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. त्यामुळे भाजप राज्यपालांकडे जाऊन केवळ संख्याबळाची माहिती देणार आहे.

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्री आमचा असेल असं भाजपचं ठरलं आहे. शिवसेनेसोबत तडजोड झाली तर ती फक्त मंत्रिपदाबाबत होईल. असे भाजपकडून सांगण्यात आलं आहे. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून काही प्रस्ताव येतो का? (president rule in maharashtra) यासाठी वाट बघावी लागणार आहे.

याशिवाय भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची कोणतीही तयारी केलेली नाही. 8 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असे बोललं जात असलं, तरी याची कोणतीही तयारी भाजपकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं (Congress Conditionally Supports Shivsena) आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

(president rule in maharashtra)