गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का? भाजपचा खोचक सवाल

| Updated on: Nov 01, 2020 | 11:31 AM

मंदिर खुली करण्यावरुन त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकाही केली आहे. (BJP Criticism Home Minister Anil Deshmukh on Temple Bhumipujan)

गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का? भाजपचा खोचक सवाल
Follow us on

मुंबई : “गृहमंत्री अनिल देशमुख एका मंदिराचे भूमिपजन करणार आहे. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली का?” असा खोचक सवाल भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केला आहे. तसेच मंदिर खुली करण्यावरुन त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकाही केली आहे. (BJP Criticism Home Minister Anil Deshmukh on Temple Bhumipujan)

“गृहमंत्री अनिल देशमुख आज एका मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली का?” असा प्रश्न तुषार भोसले यांनी केला आहे.

“तसेच कारण ‘काहींना वाटतं की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल !’ आणि ‘ई भूमिपूजन’ करावे अशी या आपल्या नेत्यांची अनुक्रमे मते आहेत,” असे ट्वीट तुषार भोसले यांनी केले आहे. त्यामुळे आता यावरुन राजकारण रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अनिल देशमुख आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराचे पुजन करणार आहेत. खेतिया रस्त्यावर मोहिदेतर्फे हवेली शिवारात श्री विष्णूपुरम तीर्थाच्या पाया भरणीनिमित्त अधिष्ठान महापूजा आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा अनिल देशमुखांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमावरुनच भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (BJP Criticism Home Minister Anil Deshmukh on Temple Bhumipujan)

संबंधित बातम्या :

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह