पक्षात सूज आणणारे नाही, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत : नितीन गडकरी

| Updated on: Jan 25, 2020 | 3:55 PM

"पक्षात जास्त काड्या करणारे लोकं नको, इकडून तिकडे जाणारे, गटबाजी करणारे लोक नको, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari Nagpur) केले.

पक्षात सूज आणणारे नाही, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : “पक्षात जास्त काड्या करणारे लोकं नको, इकडून तिकडे जाणारे, गटबाजी करणारे लोक नको, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari Nagpur) केले. “पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील. मात्र ते निष्ठावंत असले पाहिजे. पक्षात सूज आणणारे कार्यकर्ते नको,” असेही गडकरी म्हणाले. भाजपचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते

आनंदराव ठवरे हे भाजपचे जनसंघाच्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा आज भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा (Nitin Gadkari Nagpur) दिला.

“1974 मध्ये भाजपचे गंगाधरराव फडणवीस हे उपमहापौर झाले. त्यावेळी इतका आनंद झाला होता की जणू काही आपल्या पक्षाचं पंतप्रधानच झाला. आता माहीत झालं की उपमहापौर यांना काहीही अधिकार नसतात. मात्र पहिलं पद मिळाल्याने आम्ही खूप नाचलो होतो. आणीबाणीत पार्टी कठीण वेळेतून गेली. पार्टी चालवणे कठीण होते. मात्र आनंदराव पायऱ्याचे दगड आहेत. त्यांच्या परिश्रमातून पार्टी आज एवढी मोठी झाली,” असेही गडकरी म्हणाले.

“नागपूर जिल्ह्यात सुरुवातीची पार्टी पूर्ण संपली होती. मात्र आनंदरावसारख्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते जोडले आणि आज सागर उभा केला. आता पार्टीत असलेलं अनेक जण वेगवेगळ्या पार्टीत होते. त्यांना पार्टीत आणण्याचं काम त्यांनी केलं. भाजपची स्थापना झाली त्यानंतर चांगले दिवस आले. पार्टी चालत्या गाडीप्रमाणे आहे. या पार्टीत पारिवारिक वातावरण आहे. ही पार्टी कोण्याएकाची नाही, कुठल्याही जाती पातीचा पक्षात विचार केला जात नाही. हा पक्ष सगळ्यांचा आहे. जुने निष्ठावान कार्यकर्ते जेव्हा आपल्यात नसतात तेव्हा दुःख होते. मात्र पार्टीत सूज आणणारे कार्यकर्ते नको,” असंही त्यांनी यावेळी (Nitin Gadkari Nagpur) सांगितले

“विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. विधानसभा निवडणुकीत 105 जागा भाजपला मिळाल्या. त्यामुळे सेना भाजपला बहुमत होतं. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असं कुणी म्हणत असेल तर मला मान्य नाही. निवडणुकीनंतर शिवसेनेनं विचारांशी विश्वासघात केला. येणाऱ्या काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघर्ष करायचा आहे. पक्षाचा विस्तार करायचा आहे. निवडणुकीत जय पराजय होतंच असतात,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

“नागपूर शहर आणि जिल्ह्यात आपण शक्तीशाली आहोत. निवडणुका न होणाऱ्या पक्षात लोकशाही नाही असा टोलाही गडकरींनी सेनेला लगावला. भाजपात लोकशाही आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ते हे या पक्षाचे मालक आहे. आम्ही नाही. सामर्थ्यवान लोकांच्या विरोधात दुबळे एकत्र येतात. त्यामुळे जे कधीही एकत्र येत नव्हते, एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. ये एकत्र आले,” असेही गडकरी (Nitin Gadkari Nagpur) म्हणाले.