राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले पिता-पुत्र पवारांसाठी मैदानात, पडळकरांवर हल्लाबोल

| Updated on: Jun 30, 2020 | 8:53 PM

गोपीचंद पडळकरांच्या विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक आहे, तर भाजप नेते बॅकफूटवर गेले (Vaibhav Pichad Criticizes Gopichand Padalkar) आहेत.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले पिता-पुत्र पवारांसाठी मैदानात, पडळकरांवर हल्लाबोल
Follow us on

शिर्डी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर, विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया आल्या. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. पडळकरांच्या विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक आहे, तर भाजप नेते बॅकफूटवर गेले आहेत. पण राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या भाजपा नेते वैभव पिचड यांनी पडळकरांना घरचा आहेर दिला आहे. (Vaibhav Pichad stands with Sharad Pawar Criticizes Gopichand Padalkar)

“गेली 50 वर्ष शरद पवारांनी अविरतपणे जनतेची कामे केली आहे. आपण घरांमध्ये देखील ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. त्यामुळे त्यांनी चुकीचा शब्द वापरल्यामुळे त्यांनाही चुकीला चूक सांगणे गरजेचे आहे. चुकीला चूक म्हणणं हे संस्कार आपल्याला दिले गेले आहे. त्यामुळे पडळकरांचं वक्तव्य हे चुकीचंच आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते वैभव पिचड यांनी दिली.

मधुकर पिचड यांचीही टीका

तर दुसरीकडे वैभव पिचड यांचे पिता आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये असतानाही पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. सध्या भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. “मी भाजपात असलो तरी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं आहे. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे” असा हल्लाबोल मधुकर पिचड यांनी केला. पिचड यांनी पत्रक काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला.

दरम्यान वैभव पिचड आणि मधुकर पिचड या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियेमुळे भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे या पिता पुत्राने पक्ष जरी बदलला असला, तरी पवारांशी जुळलेली नाळ यावरुन दिसून येत आहे.  (Vaibhav Pichad stands with Sharad Pawar Criticizes Gopichand Padalkar)

मधुकर पिचड, वैभव पिचडांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचाही यामध्ये समावेश होता.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपद मिळालं.

विरोधी पक्षनेते म्हणूनही मधुकर पिचड यांनी काम पाहिलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून ते आमदार झाले. अकोले तालुक्यावर पिचड यांची मजबूत पकड होती. पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेले वैभव पिचड यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पराभव करुन, पिचड पिता पुत्रांना धक्का दिला होता. (Vaibhav Pichad stands with Sharad Pawar Criticizes Gopichand Padalkar)

संबंधित बातम्या : 

भाजपमध्ये गेलो असलो तरी शरद पवारांसोबत काम केलंय, पडळकरांच्या टीकेनंतर ज्येष्ठ नेता आक्रमक

माझं मत मी परखडपणे मांडत असतो, गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया