AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या कार्यक्रमात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिंदेंच्या कार्यक्रमात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरा-भाईंदर येथील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.

शिंदेंच्या कार्यक्रमात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 11, 2022 | 3:56 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यांनतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. अर्थात एकनाथ शिंदे गट भाजपच्या सोबत सत्तेत भागीदार बनला आहे. मात्र, शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिंदेंच्या कार्यक्रमात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरा-भाईंदर येथील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.

नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गेटजवळ अडवले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण होते.

मला आणि माझ्या सर्व भाजपच्या सर्व नगरसेवकांना या नाट्यगृहाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होते. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे या सर्व नगरसेवकांना या कार्यक्रमला जाऊ दिले नाही अशी तक्रार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केली आहे.

पोलिसांनी या सर्व नगरसेवकांची अडवणूक केली आहे. या प्रकरणाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचेही नरेंद्र मेहता म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. पण, पालिका आयुक्त योग्य पद्धतीने आमच्या नगरसेवकांना वागणूक देत नसल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?