मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

| Updated on: Jan 25, 2022 | 5:47 PM

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेला चारी मुंड्या चीत करत, महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प भाजपनं केला असल्याचं आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक
मुंबई भाजप बैठक
Follow us on

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपही चांगलीच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत, महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प भाजपनं केला असल्याचं आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प

आशिष शेलार म्हणाले की, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.

मुंबई महापालिका निवडणुका वेळेत व्हाव्यात- शेलार

निवडणुका योग्य वेळी झाल्या पाहिजेत. त्या होत नसतील तर कारण काय? आणि त्याबाबतची स्पष्टता जोपर्यंत जनता आणि आमच्यासमोर येणार नाही तोवर याबाबत प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. पण सर्वसाधारणपणे मुंबई महापालिकाच्या निवडणुका वेळेत होणं हे कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सर्व पावलं उशिराने टाकत आहे का? असा आमच्यासमोर प्रश्न आहे, असंही शेलार म्हणाले.

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीही नियुक्ती

दुसरीकडे पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने चैनसुख संचेती यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे . याच निवडणुकीसाठी आमदार डॉ . रामदास आंबटकर यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

इतर बातम्या :

लक्ष्मी हरवली म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस, भाजप नेत्या Pankaja Munde यांचा धनंजय मुंडेंवर थेट निशाणा!

धनंजय मुंडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, खोटी अ‍ॅट्रॉसिटी लावली, पंकजा मुंडेंचा घणाघात!