AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Sambhaji Nagar Ward 153 : राज्यातील सत्ता बदलानंतर आता भाजपनं मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंसमोर भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत.

BMC Election 2022 Sambhaji Nagar Ward 153 : राज्यातील सत्ता बदलानंतर आता भाजपनं मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंसमोर भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान
sagar joshi
sagar joshi | Updated on: Aug 15, 2022 | 11:24 PM
Share

मुंबई : महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपनं जोरदार रणनिती आखली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेना अर्ध्याहून अधिक फुटलीय. अशावेळी मुंबई महापालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं जोरदार मोहीम हाती घेतलीय. त्याचसाठी भाजपकडून पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार, खासदार गेले असले तरी सच्चा शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबतच असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ताब्यात घेण्यात भाजपला यश येणार नाही, असा दावा ठाकरे गटातील नेते करत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील काही आमदारही गेले असल्यानं ठाकरेंना त्याचा मोठा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत. अशावेळी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 153 कोणत्या पक्षाचे उमेदवार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 153 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 153 मधील एकूण लोकसंख्या 49 हजार 983 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 हजार 750, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 673 इतकी आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार :

अनिल रामचंद्र पाटणकर – शिवसेना – 13,683 मते (विजयी) नागेश अनंत तवटे – भाजप – 5,816 मते अविनाश हरिश्चंद्र पांचाळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 2, 553 मते हेमंत अनंत पाटील – भाजप – 2,125

प्रभाग क्रमांक 153 च्या सीमा :

उत्तरेला प्रभाग क्रमांक 136 एम पश्चिम व एन विभागाची सामाईक सीमा, पूर्वेला प्रभाग क्रमांक 137 नाला, दक्षिणेला प्रभाग क्रमांक 154, 155 नाला, हार्बर रेल्वे लाईन, तर पश्चिमेला प्रभाग क्रमांक 136, 170 एम/पश्चिम, एल व एन विभाग सामाईक.

प्रभाग क्रमांक 153 ची व्याप्ती :

घाटकोपर-माहूल रोड व ‘एम/पश्चिम’ व ‘एन’ विभागाच्या सामाईक सीमेच्या (नाला) नाक्यापासून, तेथून उक्त सीमेच्या दक्षिणवाजूने पूर्वेकडे ‘एम/पश्चिम’ व ‘एम/ पूर्व विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (नाला), तेथून उक्त सामाईक सीमेच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे छेडानगर रोड नं. 3 पर्यंत, तेथून खेडा नगर रोड नं. 3 च्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे व पश्चिमबाजूने दक्षिणेकडे नाल्यापर्यंत, तेथून उक्त नाल्याच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे श्रीनगर कॉम्प्लेक्स सोसायटीच्या पूर्वेकडील कुंपणभिंतीपर्यंत, तेथून उक्त कुंपणभिंतीच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे, उत्तरबाजूने पश्चिमेकडे व पूर्वबाजूने उत्तरेकडे मुंजालनगर कॉम्प्लेक्सच्या दक्षिण कुंपणभिंतीपर्यंत, तेथून उक्त कुंपणभितीच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत तेथून पूर्वी मार्गाच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे हार्बर रेल्वे लाईन्सपर्यंत, तेथून हार्बर रेल्वे लाईन्सच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे तानसा पाईपलाईनपर्यंत (एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या सामाईक सीमा), तेथून उक्त पाईपलाईनच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे ‘एम/पश्चिम’ व ‘एन’ विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (सोमय्या नाला), तेथून उक्त सीमेच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे घाटकोपर-माहूल रोडपर्यंत तेथून घाटकोपर-माहूल रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे ‘एम/पश्चिम’ व ‘एन’ विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत.. . म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत.

सदर प्रभागात टिळकनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर, पेस्तम सागर कॉलनी या प्रमुख ठिकाणे/वस्ती/नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?