Nana Patole : जीडीपी घरसत असताना डीपी बदलण्याचे आवाहन केलं जातंय, नाना पटोले यांचा घणाघाती हल्ला

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पडल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर बोलताना सुरवातीला हॅलो म्हणण्यापेक्षा वन्दे मातरम् चा उच्चार करावा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला विरोध होत असताना त्यांनी या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला आहे. वन्दे मातरम् म्हणावेच असे नाही तर तो ऐच्छिक विषय असल्याचे सांगितले आहे.

Nana Patole : जीडीपी घरसत असताना डीपी बदलण्याचे आवाहन केलं जातंय, नाना पटोले यांचा घणाघाती हल्ला
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:50 PM

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्सहात पार पडला. मात्र, हा उत्सव तर पार पडला पण त्यानंतर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यावरुन पुन्हा (Politics) राजकारण ढवळून निघत आहे. भारत हा (Agricultural country) कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. मात्र, याच बळीराजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आणि मुख्य समस्यावरील लक्ष हटवण्यासाठी असे डीपी बदलण्याचे आणि फोनवर वन्दे मातरम् यासारख्या विषय समोर आणले जात असल्याची घणाघाती टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी केली आहे. यापेक्षा सरकारने जेडीपीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे. हत्वाचा आहे पण शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. जीडीपी घरसत असताना तो सावरण्याएवेजी डीपी बदलण्याचे आवाहन केले जात आहे.बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलताना सर्वांनी ‘जय बळीराजा’ म्हणा, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

वन्दे मातरम् वरुन राजकारण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पडल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर बोलताना सुरवातीला हॅलो म्हणण्यापेक्षा वन्दे मातरम् चा उच्चार करावा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला विरोध होत असताना त्यांनी या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला आहे. वन्दे मातरम् म्हणावेच असे नाही तर तो ऐच्छिक विषय असल्याचे सांगितले आहे. यावरुन पुन्हा कॉंग्रेसने जय बळीराजा बोला असा नारा दिला होता. त्यामुळे एका विधानावरुन राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे.

म्हणून ज बळीराजा म्हणा..!

शेतकरी हा देशाच्या कणा आहे. त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही. आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित व दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे जीड़ीपी ऐवजी डीपी बदल्यास सांगितले जाते म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतली आहे. शिवाय डीपी बदलण्यापेक्षा घसरलेला जेडीपी बदलावा असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना मदतीची गरज

सध्या कोणत्या गोष्टीवरुन राजकारण करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पण अजून पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी 75 हजार रुपये द्यावेत अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. शिवाय हीच मागणी कायम ठेवत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.