AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहाही जणांची खासदारकी जाणार? व्हीप कधी लागू होतो? काय आहेत नियम? वाचा महत्त्वाची माहिती

Shiv Sena Operation Tiger: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी फूट पडणार असल्याचे चित्र आहे. पक्षाने व्हीप जारी करुन तातडीने खासदारांची बैठक जारी केली आहे. व्हीप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जाणून घ्या व्हीप कधी लागू होतो? काय आहेत नियम?

सहाही जणांची खासदारकी जाणार? व्हीप कधी लागू होतो? काय आहेत नियम? वाचा महत्त्वाची माहिती
6 MP UBTImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 18, 2026 | 12:03 PM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी: राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाने व्हिप जारी केले. त्यानुसार दिल्लीत बैठक पार पडत आहे. या बैठकीला ज्या सहा खासदारांच्या बंडखोरीची चर्चा रंगली आहे ते सहा खासदार अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे. आता व्हीप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पण व्हीप कधी लागू होतो? त्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर…

राजकीय पक्षाने काढलेला ‘व्हिप’ (पक्षाचा अधिकृत आदेश) हा फक्त विधानसभा किंवा संसदेच्या सभागृहातच लागू होतो. पक्षाच्या अंतर्गत बैठकांसाठी तो लागू होत नाही.

याचे सोपे नियम खालीलप्रमाणे आहेत:

सभागृहातील नियम: जर विधानसभा किंवा संसदेत एखाद्या कायद्यावर मतदान होणार असेल आणि पक्षाने ठराविक पद्धतीने मतदान करायला (किंवा हजर राहायला) सांगितले असेल, तर आमदाराला/खासदाराला ते ऐकावेच लागते. तिथे व्हिपचे उल्लंघन केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदारकी किंवा खासदारकी जाऊ शकते (अपात्र ठरवले जाऊ शकते).

वाचा: राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…

पक्षाच्या बैठकांचा नियम: जर पक्षाने एखाद्या हॉटेलमध्ये, कार्यालयात किंवा अंतर्गत बैठकीला येण्यासाठी व्हिप काढला आणि एखादा आमदार तिथे गेला नाही, तर त्याची आमदारकी जात नाही.

अधिकार काय आहे?

अंतर्गत बैठकीला न आल्यामुळे पक्ष त्या आमदाराला पक्षातून काढून टाकू शकतो किंवा त्याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करू शकतो. पण, संविधानानुसार त्याचे आमदार/खासदार पद हिरावून घेऊ शकत नाही. थोडक्यात काय तर, ‘पक्षांतर बंदी कायद्या’नुसार कारवाई करायची असेल, तर व्हिपचे उल्लंघन हे सभागृहाच्या आत (मतदानाच्या वेळी) झालेले असावे लागते, पक्षाच्या घरगुती बैठकांमध्ये नाही. सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हाच निर्णय दिला आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल