AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या राज्यपालांचं छगन भुजबळांकडून खास स्वागत! राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यपाल कोश्यारी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी अन्न व नागरी परुवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर शाल, पुष्पगुच्छ देऊन भुजबळांनी राज्यपाल कोश्यारी यांचं स्वागतही केलं.

नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या राज्यपालांचं छगन भुजबळांकडून खास स्वागत! राजकीय वर्तुळात चर्चा
भगतसिंह कोश्यारी यांचे छगन भुजबळांकडून स्वागत
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 9:07 PM
Share

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) आज नाशिक जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना नाशिकच्या (Nashik) शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी अन्न व नागरी परुवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर शाल, पुष्पगुच्छ देऊन भुजबळांनी राज्यपाल कोश्यारी यांचं स्वागतही केलं. या भेटीत राज्यपाल कोश्यारी आणि छगन भुजबळ यांच्यात थोडावेळ चर्चाही पार पडली. या भेटीदरम्यान नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, भुजबळ यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत – भुजबळ

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत. तसेच जिल्ह्यातील कमी होणारी ॲक्टिव्ह रूग्णांची टक्केवारी व रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्याही आश्वासक आहे. शासनाकडून कायमच मोफत स्वरूपात लस मिळेल असे समजू नये, नागरीकांनी शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

‘येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा’

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, रुग्ण संख्या 18 हजार 500 वरून 15 हजार 500 वर आलेली असून 3 हजाराने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच पॉझिटिव्हीटी दर 41 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर आला आहे. सध्या म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. त्याचप्रमाणे शाळा सुरू झालेल्या असून शाळांमध्ये अद्याप मुले बाधित झालेले नाहीत. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. यासोबतच मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वायंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगाव मध्ये लसीकरण कमी असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही भुजबळ म्हणाले.

‘खुल्या पर्यटन स्थळावरील निर्बंध उठविले’

खुल्या पर्यटन स्थळावरील निर्बंध उठविण्यात येत आहेत. मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे बंधने कायम राहतील. सशुल्क प्रवेशाची बंदिस्त पर्यटन स्थळे मात्र शासन अधिसूचना सुधारित होईपर्यंत बंदच राहतील. विद्यार्थ्यांची अडचण होत असून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाकडून आजच घेण्यात आलेला आलेला आहे, त्यादृष्टिने सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर कार्यवाहक करण्याचेही आवाहन भुजबळ यांनी केले.

इतर बातम्या :

Sharad Pawar : ‘योद्धा ये महान है’… कोरोनामुक्त शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास शुभेच्छा!

Student Protest : विद्यार्थी आंदोलनामागे षडयंत्र, वळसे-पाटलांचा आरोप, तर आणखी एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती

Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्पही सर्वसामान्य नागरिकाला समर्पित असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.