AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : ‘योद्धा ये महान है’… कोरोनामुक्त शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास शुभेच्छा!

आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे. यावेळी त्यांनी आपले डॉक्टर, सहकारी, मित्र आणि हितचिंतकांचे आभारही मानले आहेत. शरद पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवर एक खास व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं' असं एक गीत तयार करण्यात आलं आहे.

Sharad Pawar : 'योद्धा ये महान है'... कोरोनामुक्त शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास शुभेच्छा!
शरद पवार यांच्यावर खास गीत
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 8:18 PM
Share

मुंबई : देशाच्या राजकारणातील मोठं व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा एका आजारावर मात केली आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली होती. त्याबाबत खुद्द पवार यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली होती. तसंच आपली प्रकृती उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह (Corona Negative) आल्याची माहितीही पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे. यावेळी त्यांनी आपले डॉक्टर, सहकारी, मित्र आणि हितचिंतकांचे आभारही मानले आहेत. शरद पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवर एक खास व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं’ असं एक गीत तयार करण्यात आलं असून, त्यात पवार यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशापासून ते विविध क्षेत्रातील छटा दाखवण्यात आल्या आहेत.

अडीच मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील नेते, दिग्गज व्यक्तींसोबत असलेले पवारांचे फोटो आणि व्हिडीओ यात वापरण्यात आले आहेत. त्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार, माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येषठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, केंद्रात संरक्षणमंत्री, कृषी मंत्रीपदाची सांभाळलेली जबाबदारी, बीसीआयचे अध्यक्षपद अशा अनेक जबाबदाऱ्या पेलतानाचे पवार तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळतात. ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं… हर अर्जुन का सारथी, ये इसकी पहचान हैं’ असं हे गीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सामान्य माणसांनाही खूप भावलं आहे.

शरद पवारांची कोरोनावर मात

शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सुद्धा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

24 जानेवारीला झाली होती कोरोनाची लागण

शरद पवार यांना 24 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावेळी देखील शरद पवार यांनी ट्वीट करत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच पवारांनी उपचार घेतले होते. अखेर उपचाराअंती पवारांनी कोरोनावर मात केली आहे.

इतर बातम्या :

‘आजोबा… काळजी घ्या’, शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातू भावनिक, रोहित आणि पार्थ पवारांचं ट्वीट काय?

Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.