Chandrakant Khaire: “शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार”, चंद्रकांत खैरेंचा दावा

| Updated on: Aug 29, 2022 | 12:07 PM

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.

Chandrakant Khaire: शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
Follow us on

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे. “शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असा विश्वास खैरेंनी (Chandrakant Khaire) व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

भुमरे काय म्हणाले होते?

शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्याकडचे आणखी दोन आमदार फुटणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलं. आता हे दोन आमदार नेमके कोय आहेत, यावरुन चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असलेल्या आमदारांची संख्या आधीच कमी आहे. त्यात आता आणखी दोन आमदार शिवसेनेतून फुटणार असल्याच्या वृत्तानं तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यावरच आता चंद्रकांत खैरे यांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटानं बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष अडचणीत आलाय. अश्यात मंत्री भुमरे यांनी आणखी दोन आमदर फुटणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे जर हे दोन आमदार फुटून शिंदेगटात गेले तर उद्धव ठाकरेंची सेना आणखी खिळखिळी होणार असल्याचं दिसतंय. पण हे आमदार फुटणार नसून त्यांचे 10 ते 12 आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा खैरेनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.