‘संजय राऊत राष्ट्रवादीच्या पे रोलवर’, चंद्रकांतदादांचा चिमटा; गृहमंत्री लेचेपेचे असल्याचाही टोला

| Updated on: Apr 01, 2022 | 6:57 PM

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करत आहेत', अशी जोरदार टीका चंद्रकांतदादांनी केलीय.

संजय राऊत राष्ट्रवादीच्या पे रोलवर, चंद्रकांतदादांचा चिमटा; गृहमंत्री लेचेपेचे असल्याचाही टोला
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करत आहेत’, अशी जोरदार टीका चंद्रकांतदादांनी केलीय. मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपनं पोस्टरबाजी करत महाविकास आघाडीवर टीका केलीय. ‘पुणे मेट्रोच्या उदघाटनावेळी आम्ही असं केलं का? या सरकारचं मन मोठं नाही. त्यांना केवळ मोदी नावाची अॅलर्जी आहे. फडणवीसांना कार्यक्रमाला बोलावलं असतं तर चाललं असतं, असंही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

‘सांगितलं होतं की गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे देऊ नका’

महाविकास आघाडीत सध्या गृहखात्यावरुन नाराजी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून वळसे-पाटलांचं नाव न घेता टीका होतेय. तसंच गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घेण्याची मागणीही शिवसेना नेत्यांनी केलीय. त्याबाबत विचारलं असता, गृहमंत्री म्हणून वळसे-पाटील लेचेपेचे आहेत. व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पवार कुटुंबातूनही वळसे-पाटलांचं नाव समोर आणलं. उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची वेळ निघून गेलीय. मी सांगितलं होतं की गृहमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीकडे देऊ नका. मी बोललो होतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मातोश्रीलाही कॅमेरे लावतील. पण त्यावेळी माझ्या बोलण्यावर हसले होते, असा टोलाही पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावलाय.

शिवसेनेवरही जोरदार टोलेबाजी

सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप एक हाती बाजी मारेल, असा दावा पाटील यांनी केलाय. माझी एखादी क्लिप मोडून तोडून व्हायरल केली जातेय. धनंडय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला असा व्हिडीओ व्हायरल केला जातोय. या सगळ्याबाबत आम्ही सायबर सेलकडे तक्रार करणार आहोत. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माहिती भरुन घेतली जातेय. PayTM वरुन पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातूनही सुरु केलाय. भाजपने कधीही प्रचाराची पातळी सोडली नाही. जाणीव नसलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. त्यात सतेज पाटील टॉपला आहेत, असा टोलाही चंद्रकांतदादांनी सतेज पाटलांना लगावलाय.

इतर बातम्या : 

Dilip Walse Patil: मुख्यमंत्री, काँग्रेस, राऊत, तुमच्यावर नाराज आहे का? आघाडीत पेटलेल्या 5 वादांवर वळसे पाटलांनी मौन सोडलं

NCP Shivsena BJP: फडणवीसांसह भाजपबद्दल अजित पवार, वळसे पाटील तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सॉप्ट कॉर्नर? 5 नेत्यांचे 5 वक्तव्य पाहा