Chandrakant Patil: आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडी खेळाबाबत स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.

Chandrakant Patil: आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय- चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:01 AM

पुणे :  राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडी खेळाबाबत स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहंडी (Dahihandi) खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.”एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. आधी जे खेळ यात होते त्यात हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यात कुठलीही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ जोडला आहे. तशी कुणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कुणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दहीहंडीला खेळाचा दर्जा!

दहीहंडी म्हटलं तरूणाईमध्ये उत्साह संचारतो. याच दहीहंडीला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना ही घोषणा केली आहे. यासंदर्भात सरकारी आदेशही काढण्यात आला आहे. प्रो कबड्डी लीगप्रमाणे आता प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या शिवाय दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टीही मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे. पण देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या वर येऊन त्यांच्या स्वतःचा कर्तुत्वावर आले आहेत. पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतं.अनेक समजाच्या मागण्या असतात की काही योजना किंवा महामंडळ करता येतील का? त्यामुळे अमृतची योजना आणली पण आमचं सरकार गेलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर खूप काम करायला सुरुवात केलं आहे. अमृतसाठी महामंडळ निर्माण करू. अधिवेशन एकदा झालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः यासाठी एक बैठक घेण्याचा आग्रह करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....