वाचन आणि बायको; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

शिक्षण व्यवस्था आणि एकूण व्यवहारात वाचन प्रक्रिया थंडावली. याचा दोष समाज माध्यमांवर येतो, यावर तुमचं मत काय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला.

वाचन आणि बायको; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 2:36 PM

अभिजित पोते, पुणेः वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वादात सापडणारे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्तच्या एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं.  त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलंय. यावेळी त्यांनी काही उलट सुलट नाही तर त्यांच्या पत्नीचं कौतुक करणारं वक्तव्य केलंय. आजच्या दिवशी बायकोचं (Wife) उदाहरण देणं कितपत योग्य आहे, माहिती नाही, पण माझी पत्नी दिवसभरातले सगळे टीव्हीवरचे कार्यक्रम पाहते. एखादं पुस्तक (Book) दिलं तर तेही वाचते आणि मला ब्रीफिंग करते… असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण व्यवस्था आणि एकूण व्यवहारात वाचन प्रक्रिया थंडावली. याचा दोष समाज माध्यमांवर येतो, यावर तुमचं मत काय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘ नाचता येईना अंगण वाकडे.. आवडच नाहीये.. आजकाल सगळं काही टीव्हीवर पहायला मिळतं. म्हणजे स्वतःच्या बायकोचं उदाहरण देणं योग्य काही नाही मला माहिती नाही.. पण सगळ्या माध्यमांचं अपडेट घेत घेत पुस्तक दिलं की ते दिवसभरात संपलेलच असतं.

मला ब्रीफिंग करणारी माझी बायको आहे. ती मला म्हणाली, तुला वाचायला वेळ नसेल आणि तू कुठे जाणार असशील तर त्या विषयाचं ब्रीफिंग मी करते… त्यामुळे माध्यमं काही परिणाम करत नाहीत. पण वाचनाची आवडच संपली आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

पाहा चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

यावेळी त्यांनी एक उदाहरण दिलं. गोविंदाचार्य नावाचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि त्याआधी विद्यार्थी परिषदेचे सहकारी होते. ते नेहमी म्हणायचे, यदि इच्छा है तो समय निकाल सकते है… पण ते गमतीने म्हणायचे… अरे भाई समय नही है कैसे… भंजन नही करते है… ऐसा करते है क्या?

पाटील या आडनावाविषयीदेखील चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘ माझं कोल्हापूरात २२०० लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावचा पोलीस पाटील अजूनही माझा सख्खा चुलत भाऊ आहे. माझं आडनाव असं का आहे, हे मी वडिलांना जेव्हा जेव्हा विचारलं… तेव्हा ते म्हणाले, आपण जावळीचे मोरे. पण आपल्या घरात सातत्याने पोलिस पाटीलकी राहिली म्हणून आपण पाटील झालो.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.