नरेंद्र मोदींना भेटल्यावर महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं; भाजपचा महाराष्ट्रातील बडा नेता असं का म्हणाला?

भाजपच्या नेतृत्वाने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम केलं. मला पक्षाच्या त्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. मी आभारी आहे. माझ्यावर सगळ्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. मी ती जबाबदारी पार पडणार.

नरेंद्र मोदींना भेटल्यावर महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं; भाजपचा महाराष्ट्रातील बडा नेता असं का म्हणाला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:14 PM

पुणे: मी परवा मोदीजींना (narendra modi) सहपरिवार भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला 22 मिनिटं वेळ देत माझ्यासोबत आपुलकीने संवाद साधला. ती माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं. हे मी अनुभवलं आहे, असं सांगतानाच समाज संघटित झाल्याशिवाय त्या समाजामध्ये अन्याया विरोधात लढण्याची ताकद निर्माण होत नाही आणि मगच समाजाला न्याय मिळतो.समाज एकत्रित येणं आणि राहण गरजेचं. मला अभिमान आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर ओबीसी समाजाचे नेते (obc leader) म्हणून नरेंद्र मोदी आहेत. तेली समाजाचे नेते आज देशाचे पंतप्रधान आहेत, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुण्यात तिळवण तेली समाजातर्फे जाहीर नागरी सत्कार पार पडला. यावेळी बावनकुळे यांना क्रेनने हार घालून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर तसेच भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची देखील हजेरी होती. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढ्या पावसात देखील आपण समाजातील प्रतिष्ठीत कार्यकर्ते बोलावून माझा सत्कार केला. मला अभिमान आहे की, मोदीजी, फडणवीस, चंद्रकांत पाटील, जे पी नड्डा यांनी मला जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं अध्यक्ष केलं. जगातलं सर्वमान्य आणि सर्वश्रेष्ठ आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पक्षाने मला खूप दिलं. अशावेळी मला अध्यक्षाचा मान मला मिळाला त्याबद्दल मी नशीबवान आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

माझ्यावर मोठी जबाबदारी

भाजपच्या नेतृत्वाने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम केलं. मला पक्षाच्या त्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. मी आभारी आहे. माझ्यावर सगळ्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. मी ती जबाबदारी पार पडणार. ड्रायव्हरने चूक केली तर गाडीचा अपघात होतो. पायलेटने चूक केली तर विमानाचा अपघात होतो. म्हणून माझ्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पिढी घडवायची आहे

नरेंद्र मोदी यांनी देशातील 70 कोटी युवकांना उभ करण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अमेरिकेत आपली पोर ड्रायव्हर आणि वेटर झाली पाहिजेत, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.