Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर,संभाजी ब्रिगेडशी युती करून फुसका बार सोडला; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका

| Updated on: Aug 26, 2022 | 6:19 PM

Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहे की जेव्हा क्रिकेट ( निवडणूक ) सुरु होईल, तेव्हा येवढे चौकार- षटकार लागेल की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड गारद होईल. प्रचंड मतांनी आम्ही निवडणूकीचा सामना जिंकू.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर,संभाजी ब्रिगेडशी युती करून फुसका बार सोडला; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: शिवसेनेने (shivsena) संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या युतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना सध्या युती करायला कुणी मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं आहे. संभाजी ब्रिगेडने 2019ला 40 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना 0.06 टक्के मतं मिळाली होती. उद्धवजींनी केवळ 0.06 टक्के मते घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत आहे. ज्यांचे अस्तित्व नाही, असेच पार्टनर त्यांना मिळतील. संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसकाबार सोडला आहे, अशी टीका करतानाच उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर लागली आहे. त्यांचा वाईट काळ जवळ आला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

अडीच वर्षात जनतेची दुर्गती कशी झाली हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही पक्ष त्यांच्यासोबत युती करायला तयार नाहीये. त्यांचे तीन पार्टनर पळून जात आहेत. उद्धव ठाकरे यांना शेवटची घर घर लागली आहे. सध्या उद्धवजींसाठी वाईट काळ आलाय, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं इव्हेंट मॅनेजमेंट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहे की जेव्हा क्रिकेट ( निवडणूक ) सुरु होईल, तेव्हा येवढे चौकार- षटकार लागेल की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड गारद होईल. प्रचंड मतांनी आम्ही निवडणूकीचा सामना जिंकू. आदित्य ठाकरे यांचं सध्या इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे. त्यांचे दौरे होण्याआधी इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातंय. आदित्य ठाकरे मंत्री असताना चांगलं काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

धैर्यशील कदम भाजपमध्ये

दरम्यान, कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी शिवबंधन तोडून मुंबई येथील भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांची मोठी ताकद आहे. त्यांनी 2019ची विधानसभा निवडणुक शिवसेनेकडून लढली होती.