Devendra Fadnavis: टीम देवेंद्रमध्ये कुणा कुणाला संधी मिळणार? कोण कॅबिनेट, कोण राज्यमंत्री, पंकजा मुंडेंचं नाव पुन्हा चर्चेत

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजप नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळी 11 वाजता भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. उद्या 1 जुलै रोजी म्हणजे उद्याच फडवणीस सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. […]

Devendra Fadnavis: टीम देवेंद्रमध्ये कुणा कुणाला संधी मिळणार? कोण कॅबिनेट, कोण राज्यमंत्री, पंकजा मुंडेंचं नाव पुन्हा चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 10:33 AM

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजप नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळी 11 वाजता भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. उद्या 1 जुलै रोजी म्हणजे उद्याच फडवणीस सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये आलेल्या भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता पुन्हा एकदा हे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी सज्ज आहेत. मात्र टीम देवेंद्रच्या नेतृत्वात इतर मंत्र्यांना कोण-कोणती खाती मिळणार, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. भाजपच्या गोटात सुरु असलेल्या चर्चा आणि इतर हालचालींवरून कुणाला कोणतं मंत्रीपद मिळू शकतं, याचे काही आडाखे बांधले जाऊ शकतात.

पंकजांच्या नावाची पुन्हा चर्चा!

विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज आहे, अशी चर्चा आहे. पंकजांची ही नाराजी नव्या भाजप सरकारमध्ये दूर केली जाऊ शकते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. त्यामुळे त्यांच्या जागी पंकजाताईंना नियुक्त केलं जावं, अशी मागणी पंकजांच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंकजांचे कार्यकर्ते प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे पंकजांना पुन्हा संधी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

आणखी काय शक्यता?

  1. – मागील 2014 मधील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृहखातं ठेवलं होतं. यंदाही हे खातं त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे.
  2. – ज्या एकनाथ शिंदेंच्या बंडावर महाविकास आघाडी सरकार विशेषतः शिवसेना अक्षरशः पोखरून काढण्याचं कारस्थान रचलं गेलं, त्या एकनाथ शिंदेंना कोणतं खातं मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नगरविकास खातं दिलं होतं.  एकनाथ शिदेंच्या पाठिशी असलेलं संख्याबळ पाहता, त्यांना नगरविकास खात्यासह उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. यासोबत शिंदे गटातील प्रमुख आमदारांनाही महत्त्वाची खाती दिली जाऊ शकतात.
  3. -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मागील देवेंद्र सरकारमध्ये महसूल मंत्री होते. यावेळीही हे खातं मिळालं तर भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  4. – मागील वेळी पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. राम शिंदे हे आता विधान परिषदेवर निवडून आले असल्यानं त्यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं. मागील देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंना ग्रामविकास तसेच महिला व बालविकास खातं दिलं होतं. मात्र चिक्की घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. आता यंदा त्यांच्या वाट्याला काय येतं, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
  5. – मागील वेळी अर्थ, नियोजन आणि वन खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आलं होतं. आता देवेंद्र फडणवीस हे खातं मुनगंटीवारांनाच देतील की आणखी नव्यांना संधी देतील, हे पहावं लागेल.
  6. – अनिल बोंडेंना भाजप-सेना युती सरकारमध्ये कृषी खातं मिळालं होतं. ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या अनिल बोंडेंचा यंदा राज्यसभा निवडणुकीत विजय झालाय. त्यामुळे कृषी खातं अनिल बोंडेंऐवजी कुणाकडे जातंय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
  7. कोरोना काळात उद्धव ठाकरे सरकारमधील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य खातं चांगलं सांभाळलं. सध्या कोरोना संकट कमी झालं असलं तरीही आरोग्यासारखं महत्त्वाचं खातं देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये कुणाकडे जातं, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.