AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिष्याकडे? सुप्रिया सुळे म्हणाल्या….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अंनिसच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिष्याकडे? सुप्रिया सुळे म्हणाल्या....
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 24, 2022 | 11:09 AM
Share

मुंबईः  राज्यातलं शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकार कधीही कोसळू शकतं, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अचानक ज्योतिषाची (Astrologer) भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले.. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिर्डी येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने जाईल, अशी शक्यता असतानाच सगळ्या गाड्या अचानक सिन्नर तालुक्याच्या दिशेने वळाल्या. वावी गावातील मिरगावच्या इशानेश्वर मंदिरात या गाड्या थांबल्या..

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीने येथे दर्शन घेतलं. महादेवाला दुग्धाभिषेक करत पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते.

पण खरी चर्चा यानंतरची सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून भविष्य जाणून घेतल्याचं म्हटलं जातंय.

अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी यांच्यासह व्यापारी लोकही अशोक खरात यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जातात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही अचानक मिरगावात ताफा वळवून आपले भविष्य जाणून घेतले की काय, अशी चर्चा रंगली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाला भेटल्याची चर्चा आहे. पण घटनात्मक पदावर विराजमान व्यक्तीने असे वर्तन करणे बेजबाबदारपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्यलवाहक कृष्णा चांगगुडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अंनिसच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, ‘ प्रत्येकाची श्रद्धा असते, श्रद्धेवर आमचा विश्वास, मात्र अंधश्रद्धेवर नाही.. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात मोठं काम केलं.. आयुष्य पणाला लावलं.. पण घटनात्मक पदावरील व्यक्तीने श्रद्धा ठेवावी, मात्र अंधश्रद्धेबद्दल जनतेचं मत वेगळं आहे, हे लक्षात घ्यावं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...