महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप

| Updated on: Nov 11, 2020 | 7:53 PM

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झालीय पण मुख्यमंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. (Chitra Wagh criticize MVA govt and Uddhav Thackeray on woman harassment issues)

महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप
Follow us on

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराचा धागा पकडत राज्यातील वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाआघाडी सरकारला धारेवर धरले. गेल्या वर्षभरापासून राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. जळगावातील भाजपच्या कार्यालयात चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Chitra Wagh criticize MVA govt and Uddhav Thackeray on woman harassment issues)

संपूर्ण राज्यात महिला, तरुणी व बालिकांवर देखील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत त्यांची असंवेदनशीलता दाखवत आहेत, असं टीकास्त्र चित्रा वाघ यांनी महाआघाडी सरकारवर सोडले.

चित्रा वाघ यांनी महिला अत्याचारांवर घसा कोरडा होईपर्यंत बोंबा मारणारे महाआघाडीतील नेते सत्तेत आल्यानतंर महिला सुरक्षेसंदर्भात इतके गप्प का झालेत ? असा सवाल केला. “जळगाव जिल्ह्यात रावेर येथे बालिकेवर अत्याचार करुन भावंडाच्या हत्याकांडाची घटना ताजी असताना पारोळा यथे एससी समाजाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी नुसते असे म्हणून चालणार नाही तर, ती जबाबदारी देखील घ्यावीच लागेल,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चित्रा वाघ यांनी टीका केली. महिनाभरापूर्वी उस्मानाबाद येथील चिमुरडीवर अत्याचार झाला. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबतचे जबाबदार मंत्री पीडितेची साधी चौकशी करायला गेले नाहीत, यासारखी असंवेदनशीलता यापूर्वी पाहिली नसल्याचे वाघ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

(Chitra Wagh criticize MVA govt and Uddhav Thackeray on woman harassment issues)