दहिसरच्या मैत्रिणीचा नंबर टॉयलेटमध्ये, कलिनाच्या मैत्रिणीचा ट्रेनमध्ये, चित्रा वाघ नकोशा आठवणींनी शहारल्या

| Updated on: Mar 04, 2021 | 11:56 AM

"दारु पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरुषार्थ उरला आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. (Chitra Wagh memory of friends )

दहिसरच्या मैत्रिणीचा नंबर टॉयलेटमध्ये, कलिनाच्या मैत्रिणीचा ट्रेनमध्ये, चित्रा वाघ नकोशा आठवणींनी शहारल्या
भाजप नेत्या चित्रा वाघ
Follow us on

मुंबई : “माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेटमध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये लिहिलेला होता, त्यावेळी त्यांना काय आणि कसे फोन करुन त्रास दिला गेला, याची मी साक्षीदार आहे” अशी नकोशी आठवण भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) शिवसेनेचे नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. (Chitra Wagh shares memory of friends talking on Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

“दारु पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरुषार्थ उरला आहे का??? FIR होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास केलं होतं.

मैत्रिणींना येणाऱ्या फोन कॉल्सची आठवण

“मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेटमध्ये, तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये लिहिलेला. त्यावेळी त्यांना काय आणि कसे फोन करुन त्रास दिला गेला, ज्याची मी साक्षीदार आहे. लढलेलो तेव्हाही. त्यांचा लढासुद्धा प्रस्थापितांविरोधात होता. लडेंगे..जितेंगे..” अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.

चित्रा वाघ यांना यापूर्वीही धमकी

चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण प्रकरणात याआधीही धमकीचे फोन आले होते. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत” असं चित्रा वाघ त्यावेळी ट्विटरवर म्हणाल्या होत्या.

फोटो मॉर्फिंग प्रकरणी तक्रार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतीच सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. फोटो मॉर्फिंग प्रकरणी वाघ यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांचा फोटो शिवसेना नेते संजय राठोड यांच्यासोबत मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार : चित्रा वाघ

चित्रा वाघ रश्मी करंदीकर यांच्या भेटीला, फोटो मॉर्फ प्रकरणी तक्रार

(Chitra Wagh shares memory of friends talking on Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)