नारायण राणेंकडून ‘जुहूबीच’वर स्वच्छता मोहीम; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त जनतेला दिला ‘हा’ खास संदेश
नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहूबीचवर साफसफाई अभियान राबवलं. यावेळी त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधताना जनतेला खास संदेश दिला आहे.
मुंबई : आज 17 सप्टेंबर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील भाजपचे नेते विविध सामाजिक कार्यक्रम राबवून मोदींचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहूबीचवर साफसफाई अभियान राबवलं. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. त्यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त जनतेला खास संदेश दिला आहे. स्वच्छता मोहीमेमध्ये सहभाग घ्या, मुंबई, महाराष्ट्र, देश नेहमी स्वच्छ ठेवा, पर्यावरण अतिशय चांगले ठेवून लोकांचे आयुष्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 17, 2022 10:15 AM
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....

