AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon District Bank Election : महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार? भाजप-शिंदेसेनेच्या बैठकीकडे लक्ष

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्येच जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीसोबत सूत्र ठरले असताना भाजप आणि शिंदेसेनेचा तिढा अद्याप कायम आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या वाटपावरही चर्चा अडली असून, नेत्यांनी नेमकी काय भूमिका मांडली?

Jalgaon District Bank Election : महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार? भाजप-शिंदेसेनेच्या बैठकीकडे लक्ष
jalgaon district bank election bjp sena seat sharingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 10:33 PM
Share

किशोर पाटील, जळगाव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची माहिती असली, तरी शिवसेना शिंदे गटाला किती जागा द्यायच्या, याबाबत भाजपकडून अद्याप स्पष्टता आलेली नाही. जागावाटपाबरोबरच बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याच्या प्रयत्नांना अडचणी येत आहेत.

शिंदेसेनेकडून अधिक जागांची मागणी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून अधिक जागांची मागणी केली जात असल्याने जागावाटपाचा तिढा कायम असल्याची माहिती भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. राष्ट्रवादीसोबत जागावाटपाबाबत चर्चा पुढे गेली असली, तरी शिवसेनेच्या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. जागावाटपाचा प्रश्न सुटत नसल्याने दोन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.

स्वबळाची तयारी, सर्व जागांवर अर्ज भरण्याची रणनीती

महायुतीमध्ये जागावाटपावर एकमत न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ येऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांकडून पर्यायी रणनीती आखली जात आहे.

गुलाबराव पाटलांचा महायुतीसाठी प्रयत्न

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. पहिल्या बैठकीत फारशी चर्चा झालेली नाही. मात्र, दुसऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले, तर महायुती होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील जागावाटपाचा तिढा सुटतो का, याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. जागावाटप आणि पदांच्या वाटणीवर एकमत झालं नाही, तर निवडणुकीत स्वतंत्र लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान